Home माझं पिंपरी चिंचवड BJP Group Leader:प्रशांत शितोळेंची भाजप गटनेतेपदी नियुक्ती; महापालिकेतील राजकीय गणिते बदलली

BJP Group Leader:प्रशांत शितोळेंची भाजप गटनेतेपदी नियुक्ती; महापालिकेतील राजकीय गणिते बदलली

प्रशांत शितोळेंच्या गटनेतेपदाने महापालिकेत भाजपचा ‘पॉवर शो’; ८४ नगरसेवकांची गटनोंदणी, सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या राजकारणात निर्णायक वळण देणारी घडामोड घडली असून, चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रशांत शितोळे यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शितोळेंवर ही जबाबदारी सोपवून भाजपने स्पष्ट राजकीय संदेश दिला (BJP Group Leader)आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाचा अनुभव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहर कार्याध्यक्ष म्हणून केलेले संघटनात्मक काम पाहता प्रशांत शितोळे हे महापालिकेतील ताकदवान आणि रणनीतीकार नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे सभागृहातील भाजपची आक्रमक भूमिका अधिक धारदार होणार असल्याचे संकेत मिळत (BJP Group Leader) आहेत.

गटनेतेपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन तब्बल ८४ नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली. या वेळी आमदार शंकर जगताप यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या नोंदणीमुळे महापालिकेतील भाजपचा संख्याबळाचा दावा अधिक ठोस झाला असून, सत्ताधारी आघाडीसमोरील राजकीय आव्हान वाढले(BJP Group Leader) आहे.

भाजपने शितोळेंना गटनेतेपद देत “अनुभव आणि संख्याबळ” या दोन महत्त्वाच्या बाबींवर भर दिला आहे. येणाऱ्या काळात महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलण्याची आणि विरोधकांना अडचणीत आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जात असल्याचे स्पष्ट संकेत या नियुक्तीतून मिळत (BJP Group Leader)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00