दिग्गजांना बसले पराभवाचे धक्के
निगडी-यमुनानगर प्रभाग क्रमांक १३ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांनी नशीब आजमावले होते. मात्र, या दोन्ही जागांवर मनसेच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. अशीच स्थिती रावेत-किवळे प्रभाग क्रमांक १६ मध्येही पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे हे दोघेही निवडणूक लढवत होते; मात्र मतदारांनी या दांपत्यालाही नकार (Family Politics Rejected)दिला.
पतीचा विजय, पत्नीचा पराभव
पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील लढत अत्यंत चुरशीची ठरली. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपला दबदबा कायम ठेवत विजय मिळवला. मात्र, त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका शीतल काटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी, येथेही पती-पत्नी दोघांचा एकत्र सभागृह प्रवेश होऊ शकला (Family Politics Rejected)नाही.
मतदारांचा स्पष्ट संदेश
एकूणच, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कौटुंबिक समीकरणांपेक्षा वैयक्तिक कामगिरी आणि नेतृत्वक्षमतेला प्राधान्य दिले असल्याचे चित्र समोर आले आहे. ‘जोडीने सत्ता’ या संकल्पनेला स्पष्ट नकार देत, मतदारांनी एकाही दांपत्याला महापालिकेचे दरवाजे एकत्र उघडू दिले नाहीत, हा या निकालाचा महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात (Family Politics Rejected)आहे.
