Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Voting Percentage:पिंपरी-चिंचवडचा कौल कुणाकडे?

PCMC Voting Percentage:पिंपरी-चिंचवडचा कौल कुणाकडे?

दुपारी ३:३० पर्यंत ४०.५% मतदान; पुरुषांची आघाडी, महिलांचा सहभागही लक्षणीय

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तासंग्रामासाठी आज शहरात लोकशाहीचा उत्सव रंगला आहे. सकाळच्या सत्रात काहीसा संथ असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर मात्र लक्षणीयरीत्या वाढला आहे. निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरात सरासरी ४०.५ टक्के मतदान झाले असून, सायंकाळपर्यंत हा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली(PCMC Voting Percentage) जात आहे.

पुरुष मतदारांची आघाडी; महिलांचाही वाढता सहभाग

दुपारी ३:३० वाजेपर्यंत एकूण ६ लाख ९४ हजार १७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये

३,७६,९६९ पुरुष मतदार,

३,१७,१९९ महिला मतदार,

तसेच तृतीयपंथी प्रवर्गातील १० मतदारांनी मतदान केले आहे.

पुरुष मतदारांची संख्या अधिक असली तरी महिलांचा सहभागही समाधानकारक असल्याचे चित्र दिसत (PCMC Voting Percentage)आहे.

प्रभागनिहाय मतदानाचा कल

शहरातील ३२ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ४९.३३% मतदान झाले आहे. यानंतर

प्रभाग ३ – ४६.२५%,

प्रभाग १२ – ४६.१५%

या प्रभागांमध्येही मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे.

मात्र, प्रभाग क्रमांक १९ मध्ये मतदानाचा वेग अजूनही संथ असून येथे केवळ २८.४३% मतदान झाले आहे. तसेच प्रभाग १३ मध्येही फक्त २८.८६% मतदानाची नोंद झाली(PCMC Voting Percentage) आहे.

दुपारी ३:३० पर्यंत प्रभागनिहाय स्थिती

उत्साही प्रभाग (४०% पेक्षा जास्त मतदान):

प्रभाग १ (४२.४६%), प्रभाग ७ (४५.२५%), प्रभाग १६ (४५.८१%), प्रभाग १८ (४१.९९%),

प्रभाग २२ (४२.०७%), प्रभाग २४ (४४.१६%), प्रभाग २८ (४२.८९%)

मध्यम प्रतिसाद (३५% ते ४०%):

प्रभाग २० (३८.४४%), प्रभाग २१ (३८.३६%), प्रभाग २९ (३७.५०%), प्रभाग ३१ (३६%)

कमी प्रतिसाद असलेले प्रभाग:

प्रभाग १० (३१.२७%), प्रभाग ११ (३४.८९%), प्रभाग १४ (३४.६५%), प्रभाग ३० (३४.८३%)

सायंकाळच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष

मतदानाची वेळ संपेपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाढत्या मतदान टक्केवारीमुळे सत्ताधाऱ्यांना फायदा होणार की विरोधकांना, याबाबत आता शहरातील राजकीय चर्चांना उधाण आले (PCMC Voting Percentage)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00