Home माझं पिंपरी चिंचवड BJP Candidates:अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा भाजपच्या प्रभाग १५ मधील उमेदवारांना जाहीर पाठिंबा

BJP Candidates:अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा भाजपच्या प्रभाग १५ मधील उमेदवारांना जाहीर पाठिंबा

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधील भाजप उमेदवारांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा जाहीर पाठिंबा. ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार आणि कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले यांनी अधिकृत पाठिंबा पत्र देत भाजप उमेदवारांना समर्थन जाहीर केले (BJP Candidates) आहे.

 

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ ही राज्यातील सुमारे ५२ टक्के ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारी प्रभावी सामाजिक संघटना असून संघटनेअंतर्गत कर्मचारी आघाडी, विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, शेतकरी आघाडी तसेच ऑल इंडिया गौर बंजारा समाज संघटना सक्रियपणे कार्यरत आहेत. संघाच्या या जाहीर पाठिंब्यामुळे महानगरपालिकेतील विविध प्रभागांमध्ये ओबीसी समाज भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार असल्याचा विश्वास संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला (BJP Candidates)आहे.

 

पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे की, संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी निवडणुकीत जोमाने आणि उत्साहाने प्रचारात सहभागी होणार असून याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी होणार आहे. त्यामुळे पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेत भाजपची संघटनात्मक व राजकीय ताकद अधिक मजबूत होईल, असा दावा संघाने केला (BJP Candidates)आहे.

 

पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे शैलजाताई मोरे, राजू मिसाळ आणि शर्मिला बाबर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत(BJP Candidates) आहे.

 

याच वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनाही संघाकडून पाठिंबा पत्र देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी–चिंचवड शहर प्रसिद्धीप्रमुख प्रदीप नाईक उपस्थित (BJP Candidates)होते.

 

संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार आणि कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिलेल्या या जाहीर पाठिंब्यामुळे भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून आगामी निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात (BJP Candidates)आहे


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00