Home माझं पिंपरी चिंचवड Ajit Pawar Speech: राष्ट्रवादी काँग्रेस,शाहू–आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा पक्ष : अजित पवार

Ajit Pawar Speech: राष्ट्रवादी काँग्रेस,शाहू–आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा पक्ष : अजित पवार

पिंपरी-चिंचवडमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जाती–धर्मांना सोबत घेणारा, सामाजिक न्यायाचा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितल

by Admin
Spread the love

पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, नाना काटे, रामआधार धारिया, विजय कापसे, शांती सेन, विजय लोखंडे, राणी कापसे आदी मान्यवर उपस्थित (Ajit Pawar Speech)होते.

सभेत बोलताना उमेदवार संदीप वाघेरे यांनी विरोधकांकडून विविध प्रकारचे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, मात्र मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन (Ajit Pawar Speech) केले.

याचा संदर्भ घेत अजित पवार म्हणाले, “मी गेली २५ वर्षे या शहराचे नेतृत्व केले आहे. जात–धर्माचा भेद न करता अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. साधी पानपट्टी चालविणारे अण्णा बनसोडे आज विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. कविचंद भाट यांना महापौर पद दिले, तसेच आदिवासी समाजातील व्यक्तीलाही महापौरपदाची संधी दिली. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक विचारांचे उदाहरण(Ajit Pawar Speech) आहे.”

पिंपरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन करत अजित पवार यांनी मतदारांनी विकास, सामाजिक समता आणि स्थिर नेतृत्वाच्या बाजूने कौल द्यावा, असे (Ajit Pawar Speech) सांगितले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00