Home प्रेरणा / यशकथा Vighne Bhavarbhingari:विदर्भातील ग्रामीण संवेदनांचा शब्दवेध : जयदीप विघ्ने यांचा ‘भंवरभिंगरी’ काव्यसंग्रह २ जानेवारी २०२६ रोजी प्रकाशित

Vighne Bhavarbhingari:विदर्भातील ग्रामीण संवेदनांचा शब्दवेध : जयदीप विघ्ने यांचा ‘भंवरभिंगरी’ काव्यसंग्रह २ जानेवारी २०२६ रोजी प्रकाशित

ग्रामीण जीवनाच्या भावभावनांचे सशक्त चित्रण करणारे कवी जयदीप विघ्ने यांचा ‘भंवरभिंगरी’ हा नवा काव्यसंग्रह २ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे प्रकाशित होत आहे. समग्र प्रकाशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या या संग्रहाबाबत साहित्यवर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

by Admin
Spread the love

विदर्भातील ग्रामीण संवेदनांचा शब्दवेध : जयदीप विघ्ने यांचा ‘भंवरभिंगरी’ काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित विदर्भातील देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथील जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामीण जीवनाचे सशक्त कथाकार, कवी व गझलकार जयदीप एकनाथ विघ्ने यांचा नवा काव्यसंग्रह ‘भंवरभिंगरी’ लवकरच साहित्यप्रेमी वाचकांच्या भेटीला येत आहे. समग्र प्रकाशन यांच्या वतीने हा काव्यसंग्रह २ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित (Vighne Bhavarbhingari) होणार आहे.
ग्रामीण जीवनातील सूक्ष्म भावभावना, माणसांचे जगणे, संघर्ष, वेदना आणि आशा यांचे प्रभावी दर्शन जयदीप विघ्ने यांच्या लेखनातून नेहमीच घडते. त्यामुळे ‘भंवरभिंगरी’ या नव्या काव्यसंग्रहाबाबत साहित्य वर्तुळात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील सावखेड तेजन (ता. सिंदखेड राजा) येथील असलेले जयदीप विघ्ने सध्या मुपोता, देऊळगाव राजा येथे वास्तव्यास आहेत. ३ नोव्हेंबर १९८४ रोजी जन्मलेल्या विघ्ने यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या ते जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत (Vighne Bhavarbhingari) आहेत.
अध्यापनासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र आणि ठळक ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांचे ‘रुईची फुले’ (मराठी गझल संग्रह) ‘भोंगळा पाऊस’ (कथासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना वाचक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या लेखनात ग्रामीण वास्तव, मानवी नातेसंबंध, सामाजिक प्रश्न आणि अंतर्मुख करणारी संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जयदीप विघ्ने यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये काव्यमित्र राज्यस्तरीय काव्यप्रतिभा पुरस्कार – २०१६ नाना बेरगुडे स्मृती पुरस्कार – २०१८ (सेलू) गझलउन्मेष पुरस्कार – २०१९ (पुणे) गावगाडा पुरस्कार – २०२० स्मृतीशेष सूर्यभान साळवे परिवर्तन साहित्य पुरस्कार – २०२३ (बुलढाणा) जयंत पवार कथा पुरस्कार – ‘सटवा’ कथेसाठी २०२३ यांचा समावेश (Vighne Bhavarbhingari) आहे.
समग्र प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारा ‘भंवरभिंगरी’ हा काव्यसंग्रह त्यांच्या आतापर्यंतच्या साहित्यप्रवासाला नवे वळण देणारा ठरेल, असा विश्वास साहित्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे. ग्रामीण मातीशी नाळ जोडलेली ही कविता वाचकांच्या मनात निश्चितच घर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या काव्यसंग्रहाची मूळ किंमत ₹२५० असून, प्रकाशनपूर्व बुकिंगसाठी २०० प्रति प्रती घरपोच उपलब्ध होणार आहे. यासाठी फोटोत दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कवी जयदीप विघ्ने आणि प्रकाशक दास पाटील यांनी (Vighne Bhavarbhingari)केले आहे. तर प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे

Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00