Home प्रेरणा / यशकथा Ayodhya:श्रीराम मंदिर ध्वजारोहण

Ayodhya:श्रीराम मंदिर ध्वजारोहण

ध्वजाची वैशिष्ट्ये, कार्यक्रमातील घडामोडी, सुरक्षा व्यवस्था आणि अयोध्या शहरातील वातावरण जाणून घ्या या संपूर्ण वृत्तात.

by Admin
Spread the love

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर आज प्रथमच भगवा धर्मध्वज फडकावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिजीत मुहूर्तात झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्याला देशभरातून आलेल्या साधूसंतांसह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती लावली. राममंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले असल्याची औपचारिक घोषणा या कार्यक्रमात करण्यात (Ayodhya Ram Mandir Dhwajarohan)आली.

 

ध्वज २२ फूट उंचीचा, ११ फूट रुंदीचा असून त्याचे वजन जवळपास ३ किलो आहे. वैष्णव परंपरेनुसार तयार केलेल्या या ध्वजावर सूर्यवंशी परंपरेचे प्रतीक असलेले सूर्यदेव तसेच ‘ॐ’ आणि कोविदारा वृक्षाचे चिन्ह कोरले आहे. ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी सप्तमंदिरात पूजा-अर्चना करून रामलल्लाचे दर्शन(Ayodhya Ram Mandir Dhwajarohan) घेतले.

 

कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह सुमारे ७ हजार निमंत्रित उपस्थित होते. संपूर्ण अयोध्या शहर फुलांच्या सजावटीने आणि दिव्यांच्या रोषणाईने उजळले होते. शहरातील प्रमुख चौकांवर व मंदिर परिसरात मोठ्या एलईडी स्क्रीनची सोय करून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात (Ayodhya Ram Mandir Dhwajarohan)आले.

 

सुरक्षेसाठी अयोध्येत १० हजारांहून अधिक पोलिस व सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. एसपीजी, NSG स्नायपर टीम, अँटी-ड्रोन युनिट आणि बम पथक यांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली.

 

“आज ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा दिवस आला आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी सांगितले. “राम हे केवळ व्यक्ती नसून मूल्य आहेत. आपल्या आचरणात रामत्व उतरवण्याची ही संधी आहे,” असेही ते (Ayodhya Ram Mandir Dhwajarohan)म्हणाले.

 

ध्वजारोहण सोहळ्याला मोठ्या संख्येने देशभरातून भक्त उपस्थित राहिले. मंदिर प्रांगणात आणि शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामुळे अयोध्या पुन्हा एकदा भक्ती, उत्साह आणि दिव्य रोषणाईने( Ayodhya Ram Mandir) अयोध्या नगरी नटली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00