प्रतिनिधी : “२०४७ मध्ये भारताला विश्ववंदित राष्ट्र बनवायचे असेल, तर संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे अत्यावश्यक आहे!” असे प्रतिपादन शिवथरघळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी केले. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथील मनोहर सभागृहात शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित प्रकाश उपासनी लिखित, संवेदना प्रकाशन निर्मित आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित ‘आठवणींच्या वाटेवर…’ या आत्मचरित्रपर कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत (Aathavani Book Launch) होते.
मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे, लेखक प्रकाश उपासनी आणि प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख (Aathavani Book Launch) उपस्थिती होती.
डॉ. विजय लाड पुढे म्हणाले, “संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहारांचा साक्षेपाने विचार केला आहे. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘दासबोधा’त विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात. उच्चशिक्षित असलेल्या प्रकाश उपासनी यांनी आपल्या आत्मचरित्रात संत तुकोबांचे संदर्भ योग्य ठिकाणी उद्धृत केले (Aathavani Book Launch) आहेत.”
प्रकाशक नितीन हिरवे म्हणाले, “पूजनीय वा.ना. तसेच भाऊ अभ्यंकर यांनी संतविचार व संस्कार रुजवलेल्या संस्थेत, त्यांच्या पश्चात आयोजित या पुस्तकप्रकाशनाचा योग म्हणजे त्यांचे आशीर्वादच आहेत, अशी आमची नम्र (Aathavani Book Launch) होते.भावना आहे.”
लेखक प्रकाश उपासनी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “मुल्हेरसारख्या छोट्या खेड्यातून जिद्दीने वाटचाल करत रशियन भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे मला महाविद्यालयात तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रशियन भाषेचे अध्यापन करण्याची संधी मिळाली. विविध आस्थापनांमध्ये दुभाषक म्हणून आंतरराष्ट्रीय अभ्यागतांशी सुसंवादही साधता आला. एवढेच नव्हे, तर रशियातील मॉस्को येथे जाण्याचीही संधी मिळाली. या सर्व प्रवासामागे पूर्वजांचा आध्यात्मिक वारसा पाठीशी (Aathavani Book Launch) आहे.”
कार्यक्रमाच्या संयोजनात चंद्रशेखर जोशी, मीना उपासनी, मनोज मोरे, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. अभिलेखा शिंदे यांनी सुबक सूत्रसंचालन केले; तर सुभाष देशपांडे यांनी आभार मानले. “बोलावा विठ्ठल…” या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि “रत्नाकरा…” या प्रार्थनेने समारोप (Aathavani Book Launch) करण्यात आला.
