प्रतिनिधी :नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली शहरात एक आगळावेगळा आणि धाडसी उपक्रम सुरू झाला आहे. शहरातील जागरूक नागरिकांनी सर्व उमेदवारांना स्टॅम्प पेपरवर शपथपत्र भरून देण्याची अट घातली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू (Viral News) आहे.
हल्ली बऱ्याचदा सोशल मीडियावरील बातम्या खऱ्या की खोट्या असा प्रश्न पडतो कारण हल्ली ए आयच्या माध्यमातून होणाऱ्या बातम्यांचा सुळसुळाट
अशीच एक viral बातमी आमच्या एका उच्चशिक्षित वाचकाने जे व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत, आम्हाला पाठवली, ती आम्ही खरी की खोटी हे तपासून पाहिले पण तरीही या बातमीचा चांगला परिणाम आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने होऊ शकतो म्हणून आम्ही ती आपल्यासाठी पोस्ट करत आहोत
या करारनाम्यात उमेदवाराने स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे की, निवडून आल्यास तो कोणतीही ठेकेदारी करणार नाही, नगरपरिषदेकडील कोणतेही टेंडर घेणार नाही, कमिशन किंवा टक्केवारीच्या व्यवहारात सहभागी होणार नाही. तसेच नगरपालिका कामांसाठी आलेला निधी पूर्ण पारदर्शकतेने आणि जनहितार्थ वापरण्याची हमी द्यावी (Viral News) लागणार आहे.
जर कोणताही गैरव्यवहार, भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृती उमेदवाराच्या नावावर आढळली तर त्याने तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी अटही या शपथपत्रात नमूद आहे. उमेदवारांनी हे सर्व लिहून देताना कोणत्याही दबावाखाली नसून स्वमर्जीने शपथ देण्याची तरतूदही (Viral News) करारनाम्यात आहे.
या उपक्रमाला युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रभागनिहाय मतदारांचे मोठे समर्थन मिळत आहे. मतदारांचे पथक प्रत्येकी उमेदवारांना भेटून शपथपत्रावर स्वाक्षरी घेण्याचे काम करत आहे. “विकास हवा, भ्रष्टाचार नको, आणि त्यासाठी स्टॅम्पवर लिखित हमी हवी” असा आवाज शहरभर उमटत (Viral News) आहे.
साकोलीतील पारदर्शक लोकशाहीच्या दिशेने सुरू झालेली ही मोहीम आगामी निवडणूक वातावरणात नवा अध्याय लिहित आहे. जनतेच्या पुढाकारातून उभी राहिलेली ही चळवळ शहराच्या राजकीय इतिहासात नोंद केली जाईल, असा विश्वास (Viral News) नागरिक व्यक्त करत आहेत.
