प्रतिनिधी: नवीन थार घेतल्यानंतर कोकण सफरीसाठी निघालेल्या पुण्यातील सहा तरुणांवर ताम्हिणी घाटात भीषण आपत्ती कोसळली. तब्बल ५०० फूट खोल दरीत थार कोसळून सहाही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची (Tamhini Ghat tragedy) धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
माहितीनुसार, कोंढवे-कोपरे परिसरातील हे सहा मित्र रविवारी कोकण पर्यटनासाठी रवाना झाले होते. गटातील एका तरुणाने नुकतीच नवीन थार गाडी विकत घेतली होती आणि या नव्या वाहनातच सर्वजण सहलीसाठी निघाले. मात्र १८ नोव्हेंबर रोजीच हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात (Tamhini Ghat tragedy) आहे.
दोन दिवस संपर्क नसल्याने कुटुंबीयांची धावपळ
कुटुंबीयांचा दोन दिवसांपासून तरुणांशी संपर्क होत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू करताच ताम्हिणी घाटातील मध्यभागात दरीत कोसळलेली थार दिसून आली.
ड्रोनच्या मदतीने वाहनाचा ठावठिकाणा लागला, त्यानंतर रायगड पोलिस, स्थानिक रेस्क्यू टीम आणि प्रशासनाने संयुक्त बचावकार्य हाती घेतले. वाहनाचा अक्षरशः चुराडा झालेला असून सहाही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात (Tamhini Ghat tragedy) आले.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
ताम्हिणी घाटातील तीव्र वळणे आणि खोल दऱ्यांमुळे येथे अपघातांची शक्यता नेहमीच जास्त असते. प्राथमिक अंदाजानुसार,
वाहनावरील नियंत्रण सुटणे
अतिवेग
घसरणारे रस्तेया कारणांमुळे कार दरीत कोसळली असावी, अशी शक्यता व्यक्त(Tamhini Ghat tragedy) केली जात आहे.
तथापि, नेमका अपघात कसा झाला याची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध (Tamhini Ghat tragedy) नाही.
पुणे–रायगड परिसरात शोककळा
या दुर्दैवी घटनेमुळे कोंढवे-कोपरेसह पुणे आणि रायगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नव्या गाडीतील आनंदाचा प्रवास क्षणात भयावह दुर्घटनेत बदलल्याने स्थानिक पातळीवर शोककळा पसरली (Tamhini Ghat tragedy) आहे.
पोलिसांकडून अपघाताचा सर्वांगिण तपास सुरू असून, वाहनाची तांत्रिक तपासणी, मोबाईल लोकेशन आणि शक्य तितक्या सीसीटीव्ही फूटेजचा अभ्यास करण्यात (Tamhini Ghat tragedy) येत आहे.
