पिंपरी : सिमकार्डवर २० गुन्हे नोंद असल्याचे सांगत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अटक होण्याची भीती दाखवत एका दाम्पत्याची तब्बल दोन कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना निगडी प्राधिकरण परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पाच वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून फोन करणाऱ्या (Cyber Crime) अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून ओळख देत दांपत्याशी संपर्क साधला. त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या सिमकार्डवर २० तक्रारी दाखल असल्याचे सांगून त्यांचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये संबंध असल्याचा बनाव (Cyber Crime) रचून दहशत निर्माण केली.
त्यानंतर आरोपींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट आदेश, पीडीएफ फाइल्स पाठवत पडताळणी (व्हेरिफिकेशन) करण्याच्या नावाखाली दाम्पत्याला विविध बँक खात्यांमध्ये दोन कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपये जमा (Cyber Crime) करण्यास प्रवृत्त केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने सायबर पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील (Cyber Crime) तपास सुरू आहे.
https://youtu.be/FU1FAhet7FE?si=aXGOemLOReLFHgBc
