Home माझं पिंपरी चिंचवड Senior Citizens Association:प्राधिकरणातील समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिक संघाचे आयुक्तांना निवेदन

Senior Citizens Association:प्राधिकरणातील समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिक संघाचे आयुक्तांना निवेदन

प्राधिकरणातील अपुरा पाणीपुरवठा, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग, खड्डे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि उद्यानांच्या दुरवस्थेबाबत ज्येष्ठ नागरिक संघाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.

by Admin
Spread the love

(प्राधिकरण, निगडी ): प्राधिकरण परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या मागणीसाठी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात(Senior Citizens Association) आले.

 

प्राधिकरण परिसरातील अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पदपथांवरील अतिक्रमणे, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव, रस्त्याच्या दुतर्फा होणारे बेशिस्त वाहन पार्किंग, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आदी समस्यांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. तसेच प्राधिकरणातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, आवश्यक त्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे, उद्यानांची योग्य देखभाल करावी आणि उद्यानांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणी करण्यात(Senior Citizens Association) आली.

 

‘हरित सेतू’च्या नावाखाली करण्यात आलेल्या पदपथांची अवास्तव रुंदी कमी करून पादचाऱ्यांसाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. पादचाऱ्यांसाठी सुमारे एक मीटर रुंदीचा पदपथ पुरेसा असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून(Senior Citizens Association) दिले.

 

निवेदनातील सर्व मुद्दे बैठकीत सविस्तर मांडण्यात आले. त्यावर चर्चा केल्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे (Senior Citizens Association) सुचविले.

 

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा माजी महापौर चंद्रशेखर जोशी, आर. एस. कुमार, सूर्यकांत मुथियान, शामसुंदर परदेशी, गुणवंत चिखलीकर आणि शरद यन्नुवार आदी उपस्थित(Senior Citizens Association) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00