Home माझं पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Police: गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार

Pimpri Chinchwad Police: गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गणेश मंडळे, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलाचे आभार मानले.

by Admin
Spread the love

(पिंपरी) : यंदाचा गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मनःपूर्वक आभार(Pimpri Chinchwad Police) मानले.

 

सर्वांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा कोणतीही अनुचित घटना न घडता यशस्वीपणे पार पडला. या सहकार्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात मोलाची भर पडली असल्याचे चौबे यांनी (Pimpri Chinchwad Police)सांगितले.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, विविध नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य शासकीय विभागांनीही गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. विविध विभागांमध्ये झालेल्या समन्वयामुळे विसर्जन सोहळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन सुरळीतपणे पार पाडता(Pimpri Chinchwad Police) आले.

 

गेल्या बारा दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत परिश्रमपूर्वक, शिस्तबद्ध आणि सजगपणे बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा शांततेत व सुरळीतपणे पार पडला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त चौबे यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन(Pimpri Chinchwad Police) केले.

 

भविष्यातही पोलीस प्रशासन, गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील समन्वय कायम राहील, असा विश्वास चौबे यांनी व्यक्त केला. शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी संघभावनेने काम करत राहावे, असे आवाहनही त्यांनी(Pimpri Chinchwad Police) केले.

 

‘गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार. हा खऱ्या अर्थाने सर्वांच्या सांघिक प्रयत्नांचा विजय आहे,’ अशा शब्दांत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कृतज्ञता व्यक्त (Pimpri Chinchwad Police)केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00