Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Ganeshotsav 2026: 1.41 लाख गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

PCMC Ganeshotsav 2026: 1.41 लाख गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

पिंपरी-चिंचवडमध्ये ६३ कृत्रिम विसर्जन तलावांद्वारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे विसर्जन; ३८ हजार ८६ शाडू मातीच्या मूर्ती आणि ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद (PCMC Ganeshotsav 2026) मिळाला.

गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होऊ नये, यासाठी महापालिकेने शहरात ६३ कृत्रिम विसर्जन तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या माध्यमातून एकूण १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ३८ हजार ८६ पर्यावरणपूरक, अर्थात शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा समावेश(PCMC Ganeshotsav 2026) आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारीनुसार, अ क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ७८०, ब क्षेत्रीय कार्यालयात २० हजार ५२३, क क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ३७२, ड क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ८०, इ क्षेत्रीय कार्यालयात १५ हजार ४२०, फ क्षेत्रीय कार्यालयात ७ हजार ३०८, ग क्षेत्रीय कार्यालयात १० हजार २८, ह क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ९६, ज क्षेत्रीय कार्यालयात २६ हजार ५२३ आणि ल क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ११६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात (PCMC Ganeshotsav 2026) आले.

निर्माल्य संकलनावर विशेष भर

गणेशोत्सवाच्या कालावधीत निर्माल्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने विशेष व्यवस्था केली होती. उपलब्ध दैनंदिन नोंदीनुसार एकूण ६७ हजार ७७९.४५ किलो म्हणजेच सुमारे ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात(PCMC Ganeshotsav 2026) आले.

फुले, हार आणि अन्य निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर योग्य प्रक्रिया व व्यवस्थापन करण्यात आले. निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता स्वतंत्रपणे संकलित केल्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मदत (PCMC Ganeshotsav 2026) झाली.

शाडू मातीच्या पुनर्वापराला चालना

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेने शाडू मातीच्या पुनर्वापरावरही भर दिला. उपलब्ध नोंदीनुसार १ हजार ७७१ किलो शाडू मातीचे संकलन करण्यात आले. तसेच ११ हजार ४८९ किलो माती पुनर्वापरासाठी स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यात आली.

गणेशमूर्ती विसर्जनानंतर उपलब्ध होणाऱ्या शाडू मातीचा योग्य पुनर्वापर व्हावा, यासाठी नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरासोबतच विसर्जनानंतर उपलब्ध होणाऱ्या मातीच्या पुनर्वापरालाही यामुळे चालना (PCMC Ganeshotsav 2026) मिळाली.

गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेने विविध सुविधा व जनजागृती उपक्रम राबविले. कृत्रिम विसर्जन तलावांमुळे नदी, नाले, तलाव आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये थेट मूर्ती विसर्जित होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर, कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि शाडू मातीचा पुनर्वापर या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार (PCMC Ganeshotsav 2026) लागला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00