Home माझं पिंपरी चिंचवड National Media Conference 2026:राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांचा बहुमान

National Media Conference 2026:राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांचा बहुमान

आबू रोड येथे देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती; छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन सन्मान

by Admin
Spread the love

(राजस्थान, आबू रोड, दि. ९ सप्टेंबर) : ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ या संकल्पनेवर आधारित ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे स्वागत सत्र बुधवारी आबू रोड येथील मानसरोवरच्या दिव्य शक्ती अनुभूती हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या संमेलनात भारतातील विविध राज्यांसह फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि नेपाळ येथील पत्रकार व मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पत्रकारांच्या मोठ्या सहभागामुळे सभागृहही अपुरे पडले. देशाच्या मीडिया जगतातील हा विशेष प्रसंग(National Media Conference 2026) ठरला.

 

या संमेलनादरम्यान पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. भारत आणि परदेशातून सहभागी झालेल्या सुमारे दीड ते दोन हजार पत्रकारांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड येथील पत्रकारांना भव्य व्यासपीठावर सन्मान स्वीकारण्याची संधी(National Media Conference 2026) मिळाली.

महाराष्ट्र पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय मराठे, पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रोहित खर्गे, कार्याध्यक्ष दादाराव आढाव, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, शबनम सय्यद आणि उमेश पाटील यांचा बीके शांतनुबाई, नॅशनल कोऑर्डिनेटर, बीके सरला दीदी, मीडिया विंग उपाध्यक्षा आणि बीके निकुंज भाई, नॅशनल कोऑर्डिनेटर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन सन्मान करण्यात (National Media Conference 2026)आला.

 

या सन्मानानंतर मान्यवरांनी पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार संमेलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्याने सभागृहात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभागाचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी (National Media Conference 2026)दिली.

 

‘ओम शांती मीडिया’चे संपादक डॉ. बी. के. गंगाधर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, मीडिया केवळ बातम्या देण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर समाजाची विचारसरणी, दृष्टिकोन आणि दिशा प्रभावित करणारी प्रभावी व्यवस्था बनली (National Media Conference 2026)आहे.

 

मीडिया विंगच्या उपाध्यक्षा बी. के. सरला दीदी यांनी संमेलनाचा उद्देश आणि विषय स्पष्ट केला. “परमात्म्याला सुवर्णमय, श्रेष्ठ विश्वाची निर्मिती करण्यासाठी पत्रकारांची मदत हवी आहे,” असे त्यांनी (National Media Conference 2026)सांगितले.

या राष्ट्रीय मीडिया संमेलनासाठी उमेश सणस, तौफिक सय्यद, माऊली भोसले, सारिका भिंगे, गझाला सय्यद, शबनम सय्यद, रफीक सय्यद, सुरेखा काजरोळकर, शबाना शेख, कलिंदर शेख, पूजा पंडित, किसन भोसले, सुनीता कुमारी, शिवाजी घोडे, संतोष महामुनी, पूनम पाटील, लीना माने, अभिजीत पाटील, श्रीधर जगताप, संगीता पाचंगे, सिताराम मोरे आणि संतोष सागवेकर यांच्यासह देशभरातील पत्रकार बांधव उपस्थित (National Media Conference 2026)होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00