पिंपरी | प्रतिनिधी:“अजित पवार आणि पत्रकार यांचे नाते अत्यंत सौहार्दपूर्ण होते. आक्रमक किंवा विरोधी बातम्या लिहिल्या तरी ‘असं का लिहिलं’ असा जाब कधीच विचारला नाही. माध्यमांचे स्वातंत्र्य जपणारे, विकासाभिमुख नेतृत्व राज्याने आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराने गमावले आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी आपल्या भावना (Ajit Pawar Tribute)व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड शहर पत्रकारांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीसाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील सायन्स पार्कच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘आठवणीतले अजित पवार’ या विषयावर पत्रकारांनी आपल्या आठवणींना उजाळा (Ajit Pawar Tribute) दिला.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, विवेक इनामदार, सुनिल लांडगे, ॲड. संजय माने आणि नाना कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त (Ajit Pawar Tribute)केले.
ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार म्हणाले की, “अजित पवार हे पत्रकारांसाठी कायम ‘न्यूज मेकर’ होते. ते शहरात आले आणि बातमी झाली नाही, असे क्वचितच व्हायचे. क्रिकेटमध्ये कपील देव जशी फटकेबाजी करायचे, तशीच अजित पवारांची भाषणात फटकेबाजी असायची. आक्रमक शैली, हजरजबाबी उत्तरे आणि पत्रकारांशी संवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आज श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली, हे अत्यंत दुःखद (Ajit Pawar Tribute)आहे.”
सुनील लांडगे म्हणाले, “पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वेळा अजित पवार यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. शहराच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान मी जवळून अनुभवले आहे. त्यांच्या सारखा स्पष्ट व्हिजन असलेला नेता (Ajit Pawar Tribute)विरळाच.”
ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने म्हणाले, “शहरात मॉल संस्कृती वाढत असताना छोट्या व्यावसायिकांचे स्थान काय, या विषयावर मी केलेल्या बातमीवर स्वतः अजित पवारांनी संपर्क साधला. विकास करताना सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका त्यांनी सविस्तर समजावून सांगितली. बातमीकडे लक्ष देऊन स्वतः भूमिका मांडणारे ते नेतृत्व (Ajit Pawar Tribute)होते.”
नाना कांबळे म्हणाले, “बारामती लोकसभा निवडणुकीतील माझ्या वार्तांकनाची त्यांनी दखल घेतली होती. शहराच्या उभारणीत त्यांनी घातलेले लक्ष वाखाणण्यासारखे आहे. पुढे त्यांची भूमिका माध्यमांतून जपण्याची जबाबदारी आपली (Ajit Pawar Tribute) आहे.”
या वेळी अमोल काकडे, विकास शिंदे, प्रकाश गायकर, ज्ञानेश्वर भंडारे, उमेश अनारसे, पंकज खोले, रोहित खर्गे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अमोल शिंत्रे, संजय शिंदे, वर्षा कांबळे, अश्विनी पवार, राहुल हातोले, लीना माने, प्रशांत साळुंखे, मंगेश सोनटक्के, विवेक कुलकर्णी आदी उपस्थित (Ajit Pawar Tribute)होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता ओंबाळे यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप लोखंडे यांनी केले, तर समारोप व आभारप्रदर्शन अमोल शिंत्रे यांनी(Ajit Pawar Tribute) केले.
