Home आरोग्य MP Shrirang Barne:निगडीतील मोठ्या फुटपाथमुळे रस्ते अरुंद; श्रीरंग बारणेंचा महापालिका प्रशासनाला इशारा

MP Shrirang Barne:निगडीतील मोठ्या फुटपाथमुळे रस्ते अरुंद; श्रीरंग बारणेंचा महापालिका प्रशासनाला इशारा

निगडी प्राधिकरणातील ‘हरित सेतू’ प्रकल्पातील मोठ्या फुटपाथमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचा नागरिकांचा आरोप. खासदार श्रीरंग बारणेंचा प्रशासनाला इशारा.

by Admin
Spread the love

(पिंपरी, ता. ८ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पांतर्गत निगडी प्राधिकरणातील अंतर्गत रस्त्यांवर गरजेपेक्षा मोठे फुटपाथ बांधण्यात येत असल्याने मूळ रस्ते अरुंद झाले असून, परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला (MP Shrirang Barne)आहे.

 

या कामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (दि. ८) घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब (MP Shrirang Barne)विचारला.

 

निगडी प्राधिकरणातील अनेक जुन्या घरांमध्ये स्वतंत्र पार्किंगची सुविधा नसल्याने नागरिकांना वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. अशा परिस्थितीत फुटपाथ रस्त्याच्या मोठ्या भागात बांधल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे बारणे यांनी (MP Shrirang Barne)सांगितले.

 

‘हरित सेतू’सारख्या प्रकल्पांचा उद्देश नागरिकांना सुविधा देणे हा असताना, प्रत्यक्षात नागरिकांची गैरसोय होत असेल तर अशा कामांचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासनाने नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी बारणे यांनी(MP Shrirang Barne) केली.

 

फुटपाथ आणि रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांचा त्रास सुरूच राहिल्यास नागरिक स्वतःहून रस्ते आणि फुटपाथ उखडून टाकण्याच्या भूमिकेपर्यंत जाऊ शकतात, असा इशाराही बारणे यांनी(MP Shrirang Barne) दिला.

 

याबाबत खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रश्नावर लवकरच अधिकृत पत्र देऊन तीव्र विरोध नोंदविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट (MP Shrirang Barne)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00