Home गुन्हे Tathwade Crime :ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; ६५ वर्षीय नराधमाला अटक

Tathwade Crime :ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; ६५ वर्षीय नराधमाला अटक

ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाला वाकड पोलिसांनी अटक केली. वाचा सविस्तर बातमी.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ):पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेजारीच राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला वाकड पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO), भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला (Tathwade Crime) आहे.

 

रमजान बन्नूसाब बागवान (वय ६५, रा. ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित मुलींच्या आईने सोमवारी (दि. २७) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली (Tathwade Crime)आहे.

 

**चाकूचा धाक दाखवून वारंवार अत्याचार**

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे आई-वडील मजुरीचे काम करतात. घरात कोणी नसताना आरोपीने १० वर्षीय मुलीला ‘पोटात चाकू मारून ठार करेन’ अशी धमकी दिली आणि तोंड दाबून स्वतःच्या घरात नेले. त्यानंतर मे २०२६ ते २७ जून २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच, आरोपीने पीडितेच्या अवघ्या ४ वर्षांच्या लहान बहिणीलाही एका प्रसंगी अशाच प्रकारे तोंड दाबून स्वतःच्या घरात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला (Tathwade Crime) आहे.

 

**शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस**

आरोपी संशयितरीत्या मुलीला घेऊन जात असताना एका महिला शेजाऱ्याच्या ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पीडित मुलीच्या आईला याबद्दल माहिती दिली. विचारपूस केल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित आईने थेट वाकड पोलिस ठाणे गाठून तक्रार (Tathwade Crime) नोंदवली.

 

वाकड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी मजूर म्हणून काम करतो. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू (Tathwade Crime) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00