Home आरोग्य Akurdi Swimming Pool :पाऊस भरपूर, पाणीसाठाही समाधानकारक; मग प्राधिकरणमधील जलतरण तलाव कधी सुरू होणार?

Akurdi Swimming Pool :पाऊस भरपूर, पाणीसाठाही समाधानकारक; मग प्राधिकरणमधील जलतरण तलाव कधी सुरू होणार?

15 टक्के पाणीकपात अद्याप कायम असल्याने निर्णय प्रलंबित; जलतरणप्रेमी नागरिकांची महापालिकेकडे मागणी

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी): यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी शहरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले होते. पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर गेल्याने महापालिकेला शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करावी लागली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांतील मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांमध्ये पुन्हा दिलास्याचे वातावरण निर्माण झाले (Akurdi Swimming Pool) आहे.

 

अशा परिस्थितीत प्राधिकरण परिसरातील यमुनानगर आणि आकुर्डी जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी जलतरणप्रेमी नागरिकांकडून जोर धरू लागली (Akurdi Swimming Pool) आहे.

आरोग्याच्या दृष्टीने पोहणे हा सर्वांगिण आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक, धावणे किंवा सायकलिंगवर काही प्रमाणात मर्यादा येत असल्याने अनेक नागरिक जलतरणाला प्राधान्य देतात. त्यामुळे हे दोन्ही महापालिकेचे जलतरण तलाव नियमितपणे नागरिकांच्या सेवेत असावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत(Akurdi Swimming Pool) आहे.

विशेष म्हणजे, अनेक नागरिक वर्षभराचा, सहामाही किंवा त्रैमासिक तसेच मासिक पास काढून नियमित जलतरण करतात. अनेक वर्षांपासून या तलावाशी त्यांचे भावनिक नाते जुळले आहे. त्यामुळे तलाव बंद असल्याने नियमित पोहणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे नागरिक (Akurdi Swimming Pool) सांगतात.

मात्र, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे दोन महिन्यांपूर्वी हे दोन्ही जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. आता परिस्थिती सुधारली असली तरी तलाव सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला(Akurdi Swimming Pool) नाही.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “शहरातील १५ टक्के पाणीकपात अद्याप रद्द झालेली नाही. पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करून जलतरण तलाव सुरू करण्याबाबत निर्णय घेणे शक्य(Akurdi Swimming Pool) होईल.”

तर संबंधित जलतरण तलावाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, “महापालिकेकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तलाव कधी सुरू होतील, याबाबत निश्चित माहिती देता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट (Akurdi Swimming Pool) केले.

दरम्यान, जलतरणप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसामुळे धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असताना आता जलतरण तलाव सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलसंपत्तीचा काटकसरीने वापर करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नागरिक मान्य (Akurdi Swimming Pool) करतात.

आकुर्डी जलतरण तलावाचे नियमित सदस्य अतुल भोंडवे आणि शैलेश शिंदे यांनी माझं पिंपरी चिंचवडशी बोलताना सांगितले की, “जलतरण हा आमच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पावसामुळे पाणीस्थिती सुधारली असल्याने महापालिकेने शासनाच्या नियमांचे पालन करत लवकरात लवकर जलतरण तलाव सुरू करावेत,” अशी त्यांची अपेक्षा (Akurdi Swimming Pool) आहे.

नुकतीच हाती आलेली माहिती पाहता पवना धरण पूर्ण भरलेले असून त्यातून काही प्रमाणात विसर्ग पण सुरु होईल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांची अपेक्षा अगदीच गैर (Akurdi Swimming Pool) नाही.

नागरिकांच्या अपेक्षा आणि पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी यांचा समतोल साधत महापालिकेने वस्तुस्थितीचा आढावा घेऊन योग्य वेळी निर्णय घ्यावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. जलसंधारण, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि नागरिकांना आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे या तिन्ही बाबींचा विचार करून शासन आणि महापालिकेने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली(Akurdi Swimming Pool) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00