Home गुन्हे Moshi Air Pollution:मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Moshi Air Pollution:मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

मोशी परिसरातील प्लास्टिक, टायर व भंगार जाळल्यामुळे वाढलेल्या वायू प्रदूषणाची महापौर रवि लांडगे यांनी तातडीने दखल घेतली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संयुक्त पाहणी, अहवाल आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, दि. २० जुलै) : मोशी परिसरातील विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेच्या नागरिकांनी परिसरात प्लास्टिक, टायर व भंगार जाळल्यामुळे होत असलेल्या वायू प्रदूषणाबाबत महापौर रवि लांडगे यांच्याकडे निवेदन दिले. याची तातडीने दखल घेत महापौरांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी (Moshi Air Pollution)केली.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागांना संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे आदेश (Moshi Air Pollution)दिले.

यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अभिषेक बारणे व कविता आल्हाट उपस्थित होत्या. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका आवश्यक ती कठोर पावले उचलणार असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट (Moshi Air Pollution)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00