Home क्रीडा Free Fire Max EWC 2026 : Team Apex Gaming मध्ये महाराष्ट्राचा मानव शिंदे; रशर म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार एन्ट्री

Free Fire Max EWC 2026 : Team Apex Gaming मध्ये महाराष्ट्राचा मानव शिंदे; रशर म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार एन्ट्री

Free Fire Max Esports World Cup (EWC) 2026 स्पर्धेत Team Apex Gaming कडून महाराष्ट्राचा मानव शिंदे रशर म्हणून खेळणार आहे. 15 जुलैपासून ग्रुप स्टेजमध्ये Apex Gaming चे सामने रंगणार आहेत.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी):भारतातील लोकप्रिय Team Apex Gaming ने Esports World Cup (EWC) 2026 – Free Fire Max स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली असून, संघात रशर (Rusher) म्हणून महाराष्ट्राचा युवा खेळाडू आणि पिंपरी चिंचवड सुपुत्र मानव शिंदे याची निवड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड परिसरातील ई-स्पोर्ट्स प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण (Team Apex Gaming)आहे.

 

१५ जुलैपासून सुरू होणाऱ्या EWC Group Stage मध्ये Apex Gaming संघ मैदानात उतरणार आहे. आयोजकांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार संघाचे सामने दुपारी ३.३०, ४.००, ४.३५, ५.०५, ५.४० आणि ६.१० वाजता खेळविण्यात येणार (Team Apex Gaming)आहेत.

 

संघात रशर म्हणून मानव शिंदेवर आक्रमक खेळाची मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे आणि दमदार गेमप्लेमुळे भारतीय चाहत्यांना संघाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा  (Team Apex Gaming)आहे .

 

भारतीय ई-स्पोर्ट्ससाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, Team Apex Gaming आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे भारतीय गेमिंग समुदायाच्या नजरा आता मानव शिंदे आणि Apex Gaming च्या कामगिरीकडे लागल्या (Team Apex Gaming)आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00