(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी):भारतातील लोकप्रिय Team Apex Gaming ने Esports World Cup (EWC) 2026 – Free Fire Max स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली असून, संघात रशर (Rusher) म्हणून महाराष्ट्राचा युवा खेळाडू आणि पिंपरी चिंचवड सुपुत्र मानव शिंदे याची निवड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड परिसरातील ई-स्पोर्ट्स प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण (Team Apex Gaming)आहे.
१५ जुलैपासून सुरू होणाऱ्या EWC Group Stage मध्ये Apex Gaming संघ मैदानात उतरणार आहे. आयोजकांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार संघाचे सामने दुपारी ३.३०, ४.००, ४.३५, ५.०५, ५.४० आणि ६.१० वाजता खेळविण्यात येणार (Team Apex Gaming)आहेत.
संघात रशर म्हणून मानव शिंदेवर आक्रमक खेळाची मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे आणि दमदार गेमप्लेमुळे भारतीय चाहत्यांना संघाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा (Team Apex Gaming)आहे .
भारतीय ई-स्पोर्ट्ससाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, Team Apex Gaming आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे भारतीय गेमिंग समुदायाच्या नजरा आता मानव शिंदे आणि Apex Gaming च्या कामगिरीकडे लागल्या (Team Apex Gaming)आहेत.

