Home गुन्हे Antony Lara:मोशी कचरा डेपो दुर्घटना : अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Antony Lara:मोशी कचरा डेपो दुर्घटना : अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. सुरक्षा उपाययोजनांतील निष्काळजीपणामुळे नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप.

by Admin
Spread the love

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील कचरा डेपो परिसरात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला (Antony Lara)आहे.

 

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी रोहित मधुकर निकम यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५५) आणि सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५, १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला (Antony Lara)आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम संबंधित कंपनीकडे आहे. पावसाळ्यात एसआरएफएलपी (SRFLP) विभागात धोका निर्माण होऊ शकतो, याची कल्पना असूनही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी कचऱ्याचा मोठा भाग इमारतीवर आणि शेजारील परिसरात कोसळून भीषण दुर्घटना (Antony Lara)घडली.

 

या दुर्घटनेत नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मिळून १२ जण जखमी झाले (Antony Lara)आहेत.

 

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत असून, दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी (Antony Lara) दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00