Home आरोग्य Closed Pipeline Project:पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार – महापौर रवि लांडगे

Closed Pipeline Project:पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार – महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवडच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत महापौर रवि लांडगे यांनी धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सर्व मागण्या मांडून न्याय्य तोडगा काढण्याचे आश्वासन.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २ जुलै : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी गुरुवारी महापौर कार्यालयात पवना धरणग्रस्त संघटना, जमीन हक्क परिषद तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा (Closed Pipeline Project)केली.

या बैठकीत धरणग्रस्त प्रतिनिधींनी प्रकल्पासंदर्भातील विविध हरकती, सूचना, शंका तसेच मागण्या महापौरांसमोर मांडल्या. महापौरांनी प्रत्येक मुद्दा संयमाने ऐकून घेत त्याची गांभीर्याने दखल घेतली. पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीसुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असला, तरी धरणग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षणही तितकेच आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट (Closed Pipeline Project) केली.

यानंतर महापौर रवि लांडगे यांनी धरणग्रस्तांच्या निवडक प्रतिनिधींसह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, स्थानिकांच्या भावना, विविध मागण्या तसेच प्रकल्पाशी संबंधित अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात (Closed Pipeline Project) आली.

महापौरांनी प्रतिनिधींना आश्वस्त करत सांगितले की, मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या, सूचना आणि भूमिका ठामपणे मांडल्या जातील. विकास आणि लोकहित यामध्ये समतोल राखत सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन न्याय्य, सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट (Closed Pipeline Project) केले.

संवाद आणि समन्वयातूनच अशा संवेदनशील प्रश्नांची सोडवणूक शक्य असल्याचा विश्वास व्यक्त करत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि धरणग्रस्त यांच्या सहभागातून हा महत्त्वाचा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न राहील, असे महापौरांनी नमूद (Closed Pipeline Project) केले.

या बैठकीस पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे सदस्य विश्वनाथ शेलार (अध्यक्ष, मावळ तालुका भारतीय किसान संघ), यशवंत बोडके (गहुंजे ग्रामस्थ व किसान संघ सदस्य), माऊली दळवी (माजी सभापती, पंचायत समिती मावळ), सुभाष धामणकर (तालुका अध्यक्ष, भारतीय किसान मोर्चा, मावळ), माऊली सोनवणे (अध्यक्ष, जमीन हक्क परिषद), राजू आगळे (माजी पंचायत समिती सदस्य, मावळ), नारायण बोडके (अध्यक्ष, पवना धरणग्रस्त संयुक्त समिती), अनंता महिपती खैरे (तिकोना धरणग्रस्त शेतकरी), बाळासाहेब काळे (सचिव, धरणग्रस्त संघटना, मावळ), अनंता वरवे (माजी सरपंच व गणाध्यक्ष, भाजप), ह.भ.प. शंकर महाराज आडकर (शिवली, मावळ) तसेच ह.भ.प. अनंता लायगुडे (आजीवली, मावळ) उपस्थित(Closed Pipeline Project) होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00