Home गुन्हे Nasrapur Case Result :नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला अखेर फाशी; पीडितेला न्याय

Nasrapur Case Result :नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला अखेर फाशी; पीडितेला न्याय

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील दोषी भीमराव कांबळेला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. फास्ट ट्रॅक न्यायालयातील खटल्यानंतर पीडितेला अखेर न्याय मिळाला.

by Admin
Spread the love

पुणे, दि. : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषी भीमराव कांबळे याला न्यायालयाने **’मरेपर्यंत फाशी’**ची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून राज्यभरातून समाधान व्यक्त केले जात (Nasrapur Case Result) आहे.

निकालाच्या वेळी पीडित मुलीचे कुटुंब न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने फाशीची शिक्षा जाहीर करताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. अनेक वर्षांच्या न्यायलढ्यालाही अनेकदा यश मिळत नाही, मात्र या खटलल्यात केवळ दोन महिन्याच्या आतच  यश मिळाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून (Nasrapur Case Result)आली.

प्रकरणाची पार्श्वभूमी

नसरापूर परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. राज्यभर आंदोलने झाली, दोषीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आणि पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी जनभावना निर्माण (Nasrapur Case Result) झाली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला. तपास यंत्रणांनी पुरावे, वैज्ञानिक तपास आणि साक्षीदारांच्या आधारे भक्कम बाजू मांडली. सरकारी पक्षानेही प्रभावी युक्तिवाद करत दोषीविरुद्धचे आरोप सिद्ध (Nasrapur Case Result) केले.

सर्व पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून न्यायालयाने हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे नमूद करत दोषी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा (Nasrapur Case Result) सुनावली.

या निकालानंतर राज्यभरातून न्यायव्यवस्थेचे स्वागत करण्यात येत असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत (Nasrapur Case Result) आहे.

अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर पीडितेला न्याय मिळाला आणि न्यायव्यवस्थेवरील समाजाचा विश्वास आणखी दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त (Nasrapur Case Result) केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00