Home आरोग्य Swanand Mahila Sanstha:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वानंद महिला संस्थेचा योग व हास्ययोग कार्यक्रम उत्साहात

Swanand Mahila Sanstha:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वानंद महिला संस्थेचा योग व हास्ययोग कार्यक्रम उत्साहात

चिंचवडच्या बिजलीनगर येथे स्वानंद महिला संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग, ध्यान आणि लाफ्टर योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगतज्ज्ञ संजय ओस्तवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

by Admin
Spread the love

(चिंचवड, प्रतिनिधी दि. २१ जून) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये स्वानंद महिला संस्थेतर्फे महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग, ध्यान आणि हास्ययोगावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक  संजय हिरालाल ओस्तवाल यांचा “मॅजिशियन ऑफ योग”, “आरोग्यं धन-संपदा” आणि “सक्रिय योग मार्गदर्शक” या पदव्यांनी सन्मान करण्यात  (Swanand Mahila Sanstha)आला.

 

ध्यान योगी आचार्य शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने आयोजित या कार्यक्रमात महिलांना योग साधना, ध्यान आणि लाफ्टर योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तसेच महिलांच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्रही आयोजित करण्यात (Swanand Mahila Sanstha)आले.

 

कार्यक्रमास नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, माजी प्राचार्य प्रकाश कटारिया, लाफ्टर योग प्रशिक्षक मीना पोकर्णा, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब तसेच संस्थापक अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांची प्रमुख उपस्थिती(Swanand Mahila Sanstha) होती.

 

लाफ्टर योग प्रशिक्षक मीना पोकर्णा यांनी हास्ययोगाच्या माध्यमातून उपस्थित महिलांमध्ये उत्साह निर्माण केला. चर्चासत्रादरम्यान संजय ओस्तवाल यांनी विशेषतः रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळातील हार्मोनल बदलांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यानाचे महत्त्व स्पष्ट केले. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध शंकांचे निरसन करून(Swanand Mahila Sanstha) घेतले.

चर्चासत्राचे संचालन कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी केले, तर सूत्रसंचालन रेश्मा भंडारी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शोभा बंब, शकुंतला दुगड, प्रतिभा ओस्तवाल, सविता बांठिया, मनीषा चोरडिया आणि उषा बोथरा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Swanand Mahila Sanstha)लाभला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00