Home प्रेरणा / यशकथा Divyang Bhavan Pimpri:सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” हा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग ककार,गायिका अबोली जरीत यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतनमहापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान

Divyang Bhavan Pimpri:सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” हा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग ककार,गायिका अबोली जरीत यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतनमहापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान

सर्वोत्तम) "इंडियन आयडॉल फेम गायिका अबोली जरीत यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष सन्मान; देशातील पहिले 'दिव्यांग भवन' पाहून व्यक्त केल्या भावना."

by Admin
Spread the love

पिंपरी दि. १६ जून २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” तसेच इंडियन आयडॉल फेम अबोली जरत यांचा सन्मान महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात (Divyang Bhavan Pimpri)आला.

 

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती भाती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्या सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, नगरसचिव मुकेश कोळप, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित (Divyang Bhavan Pimpri)होते.

 

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना अबोली जरीत म्हणाल्या, आज पिंपरी चिंचवडहानगरपालिकेच्या वतीने झालेल्या या सन्मानामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. या शहरात येण्याची आणि येथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मला दिव्यांग भवनला भेट देण्याची संधी मिळाली. हे दिव्यांग भवन पाहून मी खरोखरच भारावून गेले. इतक्या सर्वसमावेशक पद्धतीने उभारण्यात आलेले आणि दिव्यांग बाधवांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले असे दिव्यांग भवन मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. भारतातील पहिले दिव्यांग भवन पाहण्याचा अनुभव माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरला,येथे आल्यावर मला असे अजिबात वाटले नाही की मी पहिल्यांद्याच हे पाहिले (Divyang Bhavan Pimpri) आहे.

 

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकटे आणि आव्हाने येत असतात. मात्र अशा परिस्थितीत खचून न जाता, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानायची नाही, हे मी स्वतःला नेहमी सांगत आले आहे. संघर्ष हा यशाच्या अडचणींपासून पळून न जाता त्यांचा सामना केल्यास त्यातून नवे मार्ग आणि नवी संधी निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आत्मविश्वासाने पुढे जात राहावे, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नये, असेही मत अबोली जरीत यांनी व्यक्त (Divyang Bhavan Pimpri)केले.

यावेळी महापौर यांच्या खास आग्रहास्तव त्यांनी तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू मै हे गाणे सादर (Divyang Bhavan Pimpri)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00