Home माझं पिंपरी चिंचवड Yamunanagar Water Wastage:यमुनानगरमध्ये पाणीगळतीवरून संताप; पाण्यात बसून नागरिकांचे अनोखे आंदोलन

Yamunanagar Water Wastage:यमुनानगरमध्ये पाणीगळतीवरून संताप; पाण्यात बसून नागरिकांचे अनोखे आंदोलन

पिंपरी-चिंचवडच्या यमुनानगर परिसरात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप. तीन दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त; बाबा परब आणि मनोज लांडगे यांचे अनोखे आंदोलन.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर परिसरात पाणीपुरवठा यंत्रणेच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, लाखो लिटर पाणी वाया जात असताना मागील तीन दिवसांपासून परिसरातील अनेक भागांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण (Yamunanagar Water Wastage )आहे.

 

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा परब आणि मनोज लांडगे यांनी पाण्यात बसून अनोखे आंदोलन छेडले. पाणी वाचवा आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करा, अशी मागणी करत त्यांनी संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित (Yamunanagar Water Wastage )केले.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीगळतीबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी एकीकडे मौल्यवान पाण्याची नासाडी होत आहे, तर दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत (Yamunanagar Water Wastage )आहे.

 

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून, समस्या न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे यमुनानगरवासीयांचे लक्ष लागले (Yamunanagar Water Wastage )आहे.

 

 

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00