Home पुणे Ad. Vasantrao Nagne :मंगळवेढ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव नागणे (आप्पा) यांचे निधन

Ad. Vasantrao Nagne :मंगळवेढ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव नागणे (आप्पा) यांचे निधन

मंगळवेढा येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. वसंतराव नागणे उर्फ आप्पा यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मंगळवेढा परिसरात शोककळा पसरली आहे.

by Admin
Spread the love

मंगळवेढा : येथील ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व आणि परिसरात “नागणे वकील” म्हणून परिचित असलेले अॅड. वसंतराव नागणे (आप्पा) यांचे २० मे रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते काही काळापासून वयोमानानुसार आजारी होते. त्यांच्या निधनाने मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत(Ad. Vasantrao Nagne) आहे.

 

वसंतराव नागणे यांनी अनेक वर्षे वकिली व्यवसायातून न्यायव्यवस्थेची सेवा केली. आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्याच्या कार्यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. मंगळवेढा तालुक्यातील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध(Ad. Vasantrao Nagne) होते.

 

त्यांच्या पश्चात प्रसिद्ध सर्जन डॉ. सुवर्णा दिवाण (निगडी), अॅड. विनायक नागणे, अरुणा नागणे यांच्यासह एक मुलगा, सुना, जावई, नातवंडे आणि मोठा परिवार (Ad. Vasantrao Nagne)आहे.

 

त्यांच्या निधनाने नागणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंगळवेढा परिसराने एक ज्येष्ठ, आदरणीय आणि स्नेही व्यक्तिमत्त्व गमावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली (Ad. Vasantrao Nagne)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00