Home गुन्हे Harassment Case:चिंचवडमध्ये भररस्त्यात विकृताचा किळसवाणा प्रकार; तरुणीच्या धाडसाने आरोपीची पळता भुई थोडी

Harassment Case:चिंचवडमध्ये भररस्त्यात विकृताचा किळसवाणा प्रकार; तरुणीच्या धाडसाने आरोपीची पळता भुई थोडी

चिंचवडच्या एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर तरुणीसोबत विकृत प्रकार. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करताच आरोपी फरार. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :चिंचवडमधील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर बुधवारी सकाळी घडलेल्या एका संतापजनक घटनेने शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कामावर जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत उभी असलेल्या २४ वर्षीय तरुणीसमोर एका विकृताने अश्लील चाळे करत सार्वजनिक ठिकाणी घृणास्पद कृत्य केले. मात्र, या धक्कादायक प्रसंगी तरुणीने भीती न बाळगता दाखवलेले धाडस आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत (Harassment Case) आहे.

 

बसथांब्यावर शांतता, आणि अचानक विकृताची एन्ट्री

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती. एम्पायर इस्टेट परिसरात दुचाकी पार्क करून ती बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभी होती. त्या वेळी बसथांब्यावर फारशी (Harassment Case)गर्दी नव्हती.

 

याच संधीचा फायदा घेत एक अनोळखी इसम तिथे आला आणि तिच्यासमोरील बाकावर बसला. सुरुवातीला तो सतत तिच्याकडे पाहत राहिला. काही क्षणांतच त्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्यास सुरुवात (Harassment Case)केली.

 

घाबरायचं नाही” — तरुणीचा प्रसंगावधानाचा निर्णय

 

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी काही क्षण हादरली. मात्र तिने स्वतःला सावरत थेट मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि त्या व्यक्तीचे चित्रीकरण सुरू केले. एवढ्यावरच न थांबता तिने त्या विकृताला जाबही(Harassment Case) विचारला.

 

स्वतःचे कृत्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच संशयिताची भंबेरी उडाली आणि तो तातडीने तिथून पसार (Harassment Case) झाला.

 

व्हिडिओ व्हायरल; पोलिसांची धावपळ सुरू

 

घटनेनंतर तरुणीने हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीकडे पाठवला. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी (Harassment Case) केली.

 

यानंतर पीडित तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात (Harassment Case) आहेत.

 

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

 

एम्पायर इस्टेटसारख्या गजबजलेल्या परिसरात सकाळच्या वेळी अशी घटना घडल्याने नोकरदार महिला, विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बीआरटी बसथांबे, उड्डाणपूल परिसर आणि तुलनेने शांत जागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत (Harassment Case) आहे.

 

“अशा विकृत प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात(Harassment Case) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00