प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली असताना, एका तरुणीच्या धाडसामुळे आणि चिंचवड पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विकृत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला (Harassment Case)आहे.
एम्पायर इस्टेट रोडवरील बीआरटी बस स्टॉप परिसरात एका तरुणीला अश्लील हावभाव करत त्रास देणाऱ्या चिंचवडे नगर येथील झाकीर हमीद शेख याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवणारी ही कारवाई मानली जात (Harassment Case)आहे.
घटनेदरम्यान संबंधित तरुणीने अत्यंत धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत आरोपीचे आपल्या मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. सुरुवातीला आरोपीने तिच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणी न घाबरता त्याचे व्हिडिओ शूट करत राहिल्याने आरोपी गोंधळला आणि घटनास्थळावरून पळ (Harassment Case)काढला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४० तासांच्या आत आरोपीला शोधून काढत अटक केली. या जलद कारवाईबद्दल नागरिकांकडून चिंचवड पोलिसांचे कौतुक केले जात (Harassment Case)आहे.
महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. “आपल्या लेकी, बहिणी खरंच सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांमध्ये महिलांनी घाबरून न जाता तात्काळ पोलिसांत तक्रार करणे, पुरावे जतन करणे आणि आसपासच्या नागरिकांनीही मदतीसाठी पुढे येणे अत्यंत गरजेचे (Harassment Case)आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणानंतर पालक, शैक्षणिक संस्था आणि समाजाने मुलांमध्ये महिलांविषयी आदराची भावना रुजवण्याची गरज व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ पोलिस यंत्रणा नव्हे, तर समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले जात (Harassment Case)आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन, अश्लील हावभाव किंवा संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. महिलांनीही अशा प्रकारांविरोधात आवाज उठवून कायदेशीर मदत घेण्यास मागे हटू (Harassment Case)नये.
