Home गुन्हे RPI Leader Murder:मोशीत आरपीआय नेते अनिल मोरे यांची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

RPI Leader Murder:मोशीत आरपीआय नेते अनिल मोरे यांची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

अज्ञात हल्लेखोरांचा जीवघेणा हल्ला; वायसीएम रुग्णालयात मृत घोषित, पोलिसांचा तपास सुरू

by Admin
Spread the love

मोशीतील देहू फाटा परिसरात आरपीआय कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल भाऊ मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू (RPI Leader Murder ) आहे

 

पिंपरी-चिंचवड, दि. १३ मे २०२६ : मोशी परिसरातील देहू फाटा येथे आरपीआय कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल भाऊ मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात (RPI Leader Murder )आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी अनिल मोरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित(RPI Leader Murder ) केले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैयक्तिक वाद, राजकीय कारण किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस करत (RPI Leader Murder ) आहेत.

 

एका सक्रिय राजकीय पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या झाल्याने मोशी आणि देहू फाटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांचा शोध सुरू (RPI Leader Murder ) आहे.

 

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत(RPI Leader Murder ) आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00