Home प्रेरणा / यशकथा Senior Citizens Association:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ‘फुलोरा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Senior Citizens Association:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ‘फुलोरा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

निगडी येथील प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित ‘फुलोरा’ विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नृत्य, नाटिका, हास्यदिन आणि ज्येष्ठांचा सहभाग यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.

by Admin
Spread the love

प्राधिकरण, निगडी : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शनिवार, दिनांक १० मे २०२६ रोजी निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात ‘फुलोरा’ हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न (Senior Citizens Association) झाला.

कार्यक्रमाची सुरुवात “ओम नमोजी आद्या” या ईशस्तवनाने करण्यात आली. यामुळे संपूर्ण सभागृहात मंगलमय वातावरण निर्माण झाले. वयाचा विसर पडावा अशा उत्साहात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महिला उत्कर्ष गीतांवर आधारित नृत्य सादर केले. तसेच युगलनृत्यालाही उपस्थितांनी भरभरून दाद (Senior Citizens Association)दिली.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ते “तेरी भी चूप” हे नाटक. या नाटकाचे लेखन श्री. मुकुंद जोशी यांनी केले असून दिग्दर्शन श्री. व सौ. वर्टीकर यांनी केले. तसेच “ती” या नाटिकेने समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे प्रकाश टाकत प्रेक्षकांच्या विचारांना चालना दिली. या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन सौ. अर्चना वर्टीकर यांनी केले होते. सर्व कलाकारांचा अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Senior Citizens Association)दिला.

या कार्यक्रमात संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे उद्घाटन (Senior Citizens Association)केले.

कार्यक्रमास माजी उपमहापौर सौ. शैलजाताई मोरे, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठांचे मानसपुत्र श्री. बाळासाहेब शिंदे तसेच डॉ. माऊली फरांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ‘फुलोरा’ कार्यक्रमात संघाच्या २६ ज्येष्ठ सभासदांनी सहभाग (Senior Citizens Association)नोंदवला.

कार्यक्रमाच्या नेपथ्यासाठी श्री. विश्वास फडणीस व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली गुर्जर यांनी(Senior Citizens Association) केले.

यानंतर हास्य दिनाचे औचित्य साधून विविध हास्य संघांनी विडंबन काव्य, विनोदी किस्से आणि विविध हास्यप्रकार सादर करत हास्य दिन उत्साहात साजरा केला. या उपक्रमात १९ सदस्यांनी सहभाग घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन सौ. ज्योती कानेटकर यांनी(Senior Citizens Association) केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संघाचे उपाध्यक्ष श्री. दिलीप गोसावी यांनी आभारप्रदर्शन केले. संघ प्रार्थनेनंतर या आनंददायी आणि संस्मरणीय कार्यक्रमाची सांगता (Senior Citizens Association)झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00