Home गुन्हे Molestation Case:सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचाच घृणास्पद प्रकार; तीन चिमुरड्यांशी अश्लील वर्तन, आरोपी अटकेत

Molestation Case:सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचाच घृणास्पद प्रकार; तीन चिमुरड्यांशी अश्लील वर्तन, आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू सोसायटी हादरली; १० वर्षीय मुलीच्या धाडसामुळे सुरक्षारक्षकाचा काळा चेहरा आला समोर

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ज्याच्यावर सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्याच सुरक्षारक्षकाने तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, यातील एका १० वर्षीय चिमुरडीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या नराधमाचा डाव उधळला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या (Molestation Case)आहेत.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८ मे) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन मुलींना गाठले. ‘तुम्हाला टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,’ असे आमिष दाखवून तो या चिमुरड्यांना बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न (Molestation Case)केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही या सुरक्षा रक्षकाने मुलींना दिली होती. आरोपीच्या या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने दाखवलेल्या या धैर्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस (Molestation Case) आला .
https://youtu.be/EU3wXp8bxnQ?si=cOUcsusm6PqyQCjx

Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00