Home आरोग्य PCMC Water Supply :पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा कायम; अतिरिक्त कपात नाही

PCMC Water Supply :पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा कायम; अतिरिक्त कपात नाही

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच राहणार. १५% कपातीचा निर्णय असूनही अतिरिक्त कपात नाही, आयुक्त विजय सूर्यवंशी यांची माहिती.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरात सध्या सुरू असलेला दिवसाआड व समन्यायिक पाणीपुरवठा तसाच कायम राहणार असून, सध्यातरी अतिरिक्त पाणीकपात लागू केली जाणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले (PCMC Water Supply) आहेत.

 

संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात सुमारे १५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. ही कपात भविष्यातील गरज लक्षात घेऊन नियोजित असली तरी शहरातील सध्याच्या दिवसाआड पाणीपुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले (PCMC Water Supply)आहे.

 

दरवर्षी ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवला जाणारा पाणीसाठा यंदा ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले(PCMC Water Supply) आहे.

 

सध्या शहराला पवना धरणासह आंद्रा धरण आणि इंद्रायणी नदीतील निघोजे बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. मागील सव्वासहा वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नव्याने अतिरिक्त कपात लागू केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट (PCMC Water Supply)केले.

 

दरम्यान, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया न केल्याबद्दल जलसंपदा विभागाने महापालिकेला दंड ठोठावला असून, तो भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही आयुक्तांनी (PCMC Water Supply)दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00