( पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील कथित नियोजनाच्या अभावामुळे जुनी सांगवीतील संगमनगर, पवनानगर आणि बुधघोष हाउसिंग सोसायटी परिसरातील नागरिकांना तब्बल ५६ तास पाण्याविना राहावे लागले. या काळात अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर किंवा शेजारच्या परिसराचा आधार घ्यावा (PCMC Water Supply ) लागला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारी १२ वाजता पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता नियोजित वेळेत पाणी आले नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त (PCMC Water Supply) केली.
नायडू जलकुंभासह परिसरातील जलकुंभांचे संचालन ठेकेदारामार्फत होत असून महापालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी प्रत्यक्ष देखरेखीसाठी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याची टीकाही करण्यात (PCMC Water Supply)आली.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी या प्रकरणाची बैठक घेण्यात आल्याचे सांगितले. संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून लवकरच नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट (PCMC Water Supply) केले.
नागरिकांनी संबंधितांवर कारवाई करून जलकुंभ व्यवस्थापनावर कडक नियंत्रण ठेवावे आणि पारदर्शक पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली (PCMC Water Supply) आहे.
