Home तंत्रज्ञान PCMC Water Supply:पवना धरणातील पाणीसाठा ४६.५५% वर; पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईची शक्यता

PCMC Water Supply:पवना धरणातील पाणीसाठा ४६.५५% वर; पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईची शक्यता

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा ४६.५५% वर घसरला आहे. वाढत्या उन्हामुळे (PCMC Water Supply)जूनपर्यंतच पाणी पुरण्याची शक्यता, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. ४ एप्रिल रोजी सकाळच्या नोंदीनुसार धरणात केवळ ४६.५५ टक्के पाणी शिल्लक (PCMC Water Supply) आहे.

 

हा साठा जूनअखेरपर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून पावसाळा उशिरा आल्यास पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले (PCMC Water Supply)आहे.

 

शहराचा मुख्य पाणीपुरवठा पवना धरणावर अवलंबून असून दररोज सुमारे ५२० एमएलडी पाणी उचलले जाते. याशिवाय एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही वाढती लोकसंख्या आणि गरज लक्षात घेता पाण्याचा ताण कायम (PCMC Water Supply)आहे.

 

दरम्यान, परिसरातील इतर धरणांची स्थितीही समाधानकारक नाही. आंद्रा धरणात ५३.६८ टक्के, भामा आसखेडमध्ये ६२.३७ टक्के, तर मुळशी धरणात ४५.२४ टक्के पाणीसाठा आहे. अपूर्ण प्रकल्पांमुळे शहराला सुमारे १६७ एमएलडी पाणी कमी पडत (PCMC Water Supply)आहे.

 

उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे साठा आणखी घटण्याची शक्यता असून नागरिकांनी पाणी जपून वापरणे अत्यावश्यक आहे. नळ गळती तात्काळ दुरुस्त करणे, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाणी वाचवण्याच्या सवयी अंगीकारणे, असे आवाहन प्रशासनाने केले (PCMC Water Supply)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00