Home गुन्हे दिघीत १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती

दिघीत १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती

दिघी परिसरातील गंगोत्री हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या १९ वर्षीय अथर्व विजय देशमुख या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती समोर आली असून दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

by Admin
Spread the love

दिघी परिसरातील गंगोत्री हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. अथर्व विजय देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा गंगोत्री हॉस्पिटल परिसरात पार्वती भोजने यांच्या घरी भाड्याने राहत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतला. घटना घडली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.

बराच वेळ अथर्वने प्रतिसाद न दिल्याने त्याची आई ज्योती देशमुख आणि शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घराची कडी उघडून आत प्रवेश केला असता अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला खाली उतरवून तातडीने जवळील गंगोत्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून अथर्वला मृत घोषित केले.

या प्रकरणी दिघी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. अथर्वने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आत्महत्येपूर्वी त्याने आपला मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00