Home गुन्हे PCMC Police Action:पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी प्रकरणात दोघांना अटक, ४० मोटारसायकली जप्त

PCMC Police Action:पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी प्रकरणात दोघांना अटक, ४० मोटारसायकली जप्त

दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून २१.६६ लाख किमतीच्या ४० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यातील ३४ गुन्हे उघडकीस आले.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. उलट तपास पद्धतीचा अवलंब करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त वाहनांची किंमत सुमारे २१ लाख ६६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी (PCMC Police Action) दिली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आशफाक इसाक पठाण (वय ३२, रा. पाळखी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत मुकुंद उर्फ मुकुंद उड्डवराव हारतास (वय २५, रा. पाटोदा (मावा), ता. परतूर, जि. जालना) यालाही अटक करण्यात आली (PCMC Police Action) आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आशफाक पठाण याला स्प्लेंडर कंपनीच्या मोटारसायकली विशेष पसंत असल्यामुळे तो प्रामुख्याने त्याच कंपनीच्या दुचाकी चोरी करत असे. पाथर्डी परिसरातून बसने पुण्यात येऊन तो शहरातील विविध भागांमधून मोटारसायकली चोरत असल्याचे उघड झाले. चोरी केलेल्या दुचाकी काही काळ एका ठिकाणी साठवून ठेवून नंतर त्या फायनान्स कंपनीकडून हप्ते न भरल्यामुळे जप्त झालेल्या वाहनांप्रमाणे असल्याचे सांगून परिचितांना विक्री केल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न (PCMC Police Action)झाले.

शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट दोनकडे वर्ग करण्यात (PCMC Police Action)आला.

तपास करताना पोलिसांनी नेहमीप्रमाणे आरोपीचा थेट शोध घेण्याऐवजी उलट तपास पद्धत अवलंबली. आरोपी घटनास्थळी कोणत्या मार्गाने आला याचा मागोवा घेत परिसरातील सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात (PCMC Police Action)आले.

गोपनीय माहितीच्या आधारे ७ मार्च रोजी बोलेवाडी परिसरातून आरोपी आशफाक पठाण याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान त्याने अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून २१ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे ३४ गुन्हे उघडकीस आले(PCMC Police Action) आहेत.

दरम्यान, चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणाऱ्या मुकुंद उड्डवराव हारतास यालाही पोलिसांनी अटक केली(PCMC Police Action) आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संदीप बेलसरे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, दीपक खरात, प्रविण टळे, नितीन डोरे, पोलिस हवालदार विक्रांत चव्हाण, विक्रम कुलकर्णी, कृष्णा शितोळे, दीपक शिरसाट, पोलिस शिपाई प्रशांत सेद, सुखदेव गावडे आणि रवि पवार यांचा समावेश(PCMC Police Action) होता.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00