वाकड, चिंचवड (रविवार, ८ मार्च २०२६) : आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नव्वदहून अधिक महिला उत्साहाने सहभागी (Women’s Day) झाल्या.
सभेमध्ये महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांच्या संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. “संघर्ष आणि जिद्द हीच तिची ओळख; यशाच्या शिखरावर तिची चाहूल स्पष्ट” या भावनेतून स्त्रीशक्तीला वंदन करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना आदराचा साज चढवण्याचा संदेश देण्यात (Women’s Day)आला.
स्त्री ही आई, ताई, मैत्रीण, पत्नी आणि मुलगी अशा अनेक भूमिका निभावत असते. तीच जीवनाची सुरुवात आहे, तीच माया आहे; तिच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त (Women’s Day) केली.
जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्व, संघर्ष आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव साजरा करण्याचा दिवस आहे. महिला केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची शक्ती असून अनेक जबाबदाऱ्या सांभाळत त्या समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात (Women’s Day) आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मंडळ प्रमुख अलका कळमकर यांच्यासह मीरा बोरकर, पुष्पा ढवळे, चित्रा बराटे, संगीता साठे, प्रतिभा गवळे, हेमांगी बोंडे, निर्मला झोपे, विजया चौधरी, विभा दरेकर, सुनिता सफई आणि हर्षाली देसाई यांनी विशेष परिश्रम (Women’s Day)घेतले.
