Home माझं पिंपरी चिंचवड LPG Cylinder:पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस टंचाई; पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम

LPG Cylinder:पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस टंचाई; पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाची विशेष तपासणी मोहीम सुरू. गॅस वितरकांच्या साठा व वितरण प्रक्रियेची तपासणी; बुकिंग नियमांत बदल आणि सिलिंडर दर सुमारे ९१५.५० रुपये.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ अस्थिर झाली असून कच्चे तेल आणि एलपीजी आयातीवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात घट झाल्याने नागरिकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत (LPG Cylinder) आहे.

गॅसच्या या संभाव्य टंचाईचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी काळाबाजार किंवा अनधिकृत साठेबाजी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभागाने शहरातील सर्व गॅस वितरकांकडे विशेष तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला(LPG Cylinder) आहे.

 

या मोहिमेदरम्यान गॅस वितरकांकडील साठा, नोंदी तसेच ग्राहकांना गॅस वितरणाची प्रक्रिया तपासली जाणार आहे. अलीकडील काळात अनेक नागरिकांनी गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही ठिकाणी साठा उपलब्ध असूनही ग्राहकांना उशिरा सिलिंडर दिला जात असल्याची शक्यता वर्तवली जात (LPG Cylinder) आहे.

यामुळे विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून ती वितरकांच्या साठ्यावर आणि वितरण पद्धतीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. तपासणीत कुठेही नियमभंग किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला(LPG Cylinder)  आहे.

व्यावसायिक वापरावर तात्पुरती मर्यादा

सध्याची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध गॅस साठा प्राधान्याने घरगुती ग्राहकांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल्स आणि मोठ्या व्यावसायिक आस्थापनांसाठी असलेला व्यावसायिक एलपीजी पुरवठा तात्पुरता मर्यादित करण्यात आला (LPG Cylinder) आहे.

बुकिंग नियमात बदल, दरात वाढ

गॅसच्या नियोजनासाठी बुकिंगच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी २५ ते ३० दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी हे अंतर १५ दिवसांचे (LPG Cylinder) होते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅसच्या किमतीत वाढ झाली असून पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे ९१५.५० रुपये इतकी झाली (LPG Cylinder) आहे.

नागरिकांना सुरक्षा सूचना

गॅस एजन्सीकडून करण्यात येणारी सुरक्षा तपासणी ही पूर्णपणे विनामूल्य असल्याने ग्राहकांनी कोणतेही शुल्क देऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याकडे अधिकृत ओळखपत्र आहे याची खात्री करूनच घरात प्रवेश द्यावा आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ‘ओटीपी’ शेअर करावा, असे आवाहनही करण्यात आले (LPG Cylinder) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00