पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शहरातील आर.एम.सी. (Ready Mix Concrete) प्लांट, बांधकाम स्थळे आणि बांधकाम साहित्य साठवणूक ठिकाणी निर्माण होणारी धूळ व वायू प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले ( PCMC Air Pollution) आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार आर.एम.सी. प्लांट तसेच बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले( PCMC Air Pollution) आहे.
दरम्यान, शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) मोजणी केंद्रांच्या नोंदीनुसार सध्या शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम (AQI १०० ते १५०) या श्रेणीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी सर्व आर.एम.सी. प्लांट धारक, बांधकाम व्यावसायिक तसेच बांधकाम साहित्य पुरवठादारांनी धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आले ( PCMC Air Pollution)आहे.
महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संबंधित आस्थापनांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच आवश्यक उपाययोजना पूर्ण होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले जातील. गरज भासल्यास त्या सील करण्याची कारवाईही करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली असून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले ( PCMC Air Pollution)आहे.
