(विवेक कुलकर्णी )करो या मरो अशा परिस्थितीत उतरलेल्या भारतीय संघाने जबरदस्त लढत देत वेस्ट इंडिज टीम वर 5 विकेट्सने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश केला. आता 5 मार्च रोजी भारताचा सामना इंग्लंड टीम विरुद्ध रंगणार असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष या महासंग्रामाकडे लागले(India vs WI) आहे.
नाणेफेक आणि गोलंदाजीचा निर्णय
करो या मरो अशा सामन्यात कर्णधार सूर्याकुमार यादव याच्या बाजूने नाणेफेक लागली. ड्यू फॅक्टर लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र विंडीज संघ आज खास तयारीनिशी मैदानात उतरला(India vs WI) होता.
विंडीजची दमदार फलंदाजी – 196 धावांचे आव्हान
विंडीजकडून रोस्टन चेसे, जेसन होल्डर आणि रोवमान पोवेल यांनी आक्रमक खेळ करत 196 धावांचा भक्कम स्कोअर उभारला. भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला विकेट्स मिळवण्यात अपयश आले. विशेषतः अर्शदीप सिंग आज महागडा (India vs WI)ठरला.
भारताची खराब सुरुवात
196 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात पुन्हा डळमळीत झाली. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन स्वस्तात बाद झाले आणि संघ दबावाखाली (India vs WI)गेला.
सूर्या–संजू भागीदारीने दिला आधार
त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी छोटी पण महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी संजूला साथ दिली. जरी त्यांना मोठी खेळी करता आली नाही, तरी त्यांनी डाव स्थिर ठेवण्याची भूमिका पार (India vs WI)पाडली.
संजूची ऐतिहासिक खेळी
सर्व दबाव झुगारून संजू सॅमसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. त्याने संयम आणि आक्रमकतेचा उत्तम मेळ साधत भारताला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने विराट कोहली याचा 82 धावांचा विक्रम मोडत नवीन विक्रम आपल्या नावावर केला. सामनावीर पुरस्कारही संजूला देण्यात(India vs WI) आला.
इतिहासाच्या उंबरठ्यावर भारत
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला आहे. आता विजेतेपदापासून भारत केवळ दोन पावले दूर (India vs WI) आहे.
5 मार्च रोजी इंग्लंडविरुद्धचा सेमी फायनल हा खरा कस पाहणारा सामना ठरणार आहे. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून चाहत्यांना आणखी एका संस्मरणीय विजयाची अपेक्षा आहे.
