Home महाराष्ट्र Shahu Public Library:शाहू सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Shahu Public Library:शाहू सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी

शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पूजन, शिवचरित्र व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण शिवमय झाले.

by Admin
Spread the love

शाहूनगर :शिवजयंतीनिमित्त श्री शाहू सार्वजनिक वाचनालय, शाहूनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात (Shahu Public Library)आली.

कार्यक्रमाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे प्रशिक्षक विलास जेऊरकर यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट (Shahu Public Library) केला.

मनिषा पाटील यांनी शिवरायांचा पाळणा सादर करत उपस्थितांमध्ये शिवभक्तीची भावना जागृत केली. गणेश सहाणे यांनी शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेत त्यांच्या शौर्य, धैर्य आणि लोककल्याणकारी धोरणांतील प्रेरणादायी प्रसंग ओघवत्या शैलीत (Shahu Public Library)मांडले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे, अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संयोजनात रवींद्र अडसूळ व तेजश्री घेवारी यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी तर आभार प्रदर्शन राजाराम वंजारी यांनी (Shahu Public Library)केले.

वाचनालयाचे संचालक, सल्लागार, कर्मचारी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रम उत्साह, श्रद्धा आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न (Shahu Public Library)झाला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00