23
काळेवाडी, चिंचवड (दि. 13 फेब्रुवारी 2026) : पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या नवीन कार्यकारिणी (2026–2028) चा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. ज्योतिबा मंगल कार्यालय, काळेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात 28 प्रतिनिधींनी शपथ (Senior Citizens Association) घेतली.
महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले यांची महासंघाच्या सहसचिवपदी बहुमताने निवड (Senior Citizens Association) झाली.
शपथविधीनंतर त्यांचा शाल, श्रीफळ, आयकार्ड व निवड प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन (Senior Citizens Association) केले.
