पिंपरी, दि. ७ : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पत्रकार कक्षात उत्साहात पार (Pcmc Marathi Patrakar Sangh) पडला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश संघटक अरुण कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे आदी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक उत्तम केंदळे यांचीही उपस्थिती (Pcmc Marathi Patrakar Sangh) होती.

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीत शहराध्यक्ष रोहित खर्गे, महिला पुणे जिल्हाध्यक्ष मनीषा थोरात-पिसाळ, पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे, कार्याध्यक्ष दादाराव आढाव, उपाध्यक्ष गणेश मोरे, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्क प्रमुख संदीप सोनार तसेच नागेश खजुर्गीकर, बलभीम भोसले, उमेश सनस, सीताराम मोरे, उमेश यादव, संतलाल यादव, श्रीधर जगताप आणि अजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात (Pcmc Marathi Patrakar Sangh) आली.
यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “पत्रकार हे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. शहरातील नागरिकांच्या भावना, समस्या आणि अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडत असतात. सकारात्मक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडत शहराच्या विकास प्रक्रियेला पत्रकारांनी अधिक बळ (Pcmc Marathi Patrakar Sangh) द्यावे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश संघटक अरुण कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी, तर आभार शहराध्यक्ष रोहित खर्गे यांनी मानले. कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, विविध माध्यमांचे पत्रकार तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित (Pcmc Marathi Patrakar Sangh) होते.
