पिंपरी : वकिलांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडवणे, तसेच त्यांच्या कल्याणासाठी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी-चिंचवड” या नव्या वकील संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ही संघटना सर्वच वकिलांच्या हितासाठी कार्य करेल, अशी ग्वाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी (Bar Association Pimpri) दिली.
पिंपरी-मोरवाडी न्यायालय परिसरातील बार रूममध्ये या नव्या वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अरुण खरात होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. राकेश अकोले, बी. के. कांबळे, प्रकाश निनाळे, रमेश गालफाडे, केशव घोगरे, प्रमिला गाडे आदी ज्येष्ठ वकील उपस्थित(Bar Association Pimpri) होते.
यावेळी महिला सहसचिवपदी ॲड. संगीता कुशालकर, सहसचिव ॲड. संजय माने, सहायक सहसचिवपदी ॲड. सुनील डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून ॲड. तेजस सरतापे यांची विशेष नियुक्ती करत त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात (Bar Association Pimpri)आले.
तसेच उपाध्यक्ष ॲड. सुनील माने, सचिव ॲड. तेजस चवरे, महिला सचिव ॲड. आरती अकोले, सहसचिव ॲड. प्रशांत बचुटे, महिला सहसचिव ॲड. स्नेहा कांबळे, हिशोबनीस ॲड. ऋषिकेश शिनगारे, खजिनदार ॲड. अशोक बडेकर यांच्यासह सदस्य ॲड. नागनाथ सूर्यवंशी, मनोहर सोनवणे, संघर्ष सूर्यवंशी, अविनाश कांबळे, सागर पोवार, महेश जानकर, ओंकार नाणेकर, पल्लवी कुराडे, चांगुणा काकडे आदी कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात (Bar Association Pimpri) आले.
कार्यक्रमात ॲड. समीर चव्हाण यांनी नव्या वकील संघटना स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. बार आणि बेंच यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात ॲड. अरुण खरात यांनी नव्या कार्यकारिणीस पाठिंबा दर्शवित शुभेच्छा दिल्या. तसेच ॲड. पी. एस. कांबळे व ॲड. सुनील कडूसकर यांनीही कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा (Bar Association Pimpri)दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व ॲड. प्रशांत बचुटे यांनीBar Association Pimpri) केले.
