Home माझं पिंपरी चिंचवड Ghazal Sammelan:पन्हाळा येथे गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने एकदिवसीय गझल संमेलन

Ghazal Sammelan:पन्हाळा येथे गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने एकदिवसीय गझल संमेलन

गझलयात्री – भाग ६’ या प्रातिनिधिक गझल संग्रहाचे होणार प्रकाशन

by Admin
Spread the love

पुणे : प्रतिनिधी:गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना यांच्या वतीने रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी एकदिवसीय गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सोमवारपेठ, पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न होणार  (Ghazal Sammelan) आहे.

या संमेलनाचे अध्यक्षपद पुणे येथील सुप्रसिद्ध गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी भूषविणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध गझलकार डॉ. मंदार खरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून मिरज येथील ख्यातनाम गझलकार भीमराव धुळूबुळू तसेच पुणे येथील प्रदीप तळेकर उपस्थित राहणार आहेत.

संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहसचिव प्रा. एन. आर. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी असतील.

या प्रसंगी पुणे विभागातील गझलकारांच्या ‘गझलयात्री – भाग ६’ या प्रातिनिधिक गझल संग्रहाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या गझल संमेलनास पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी या जिल्ह्यांतील गझलकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, गझल मंथन साहित्य संस्थेच्या पुणे विभाग व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या संयुक्त वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एकदिवसीय गझल संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत गझलकार व गझलकारांच्या गझल मुशायऱ्यांची मेजवानी गझल रसिकांना अनुभवता येणार आहे. सर्व गझलप्रेमींनी या गझल मुशायऱ्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखेडे, उपाध्यक्ष देवकुमार, सहसचिव ऊमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत जाधव, आयोजन समितीचे अ‍ॅड. मुकुंदराव जाधव, मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, तसेच पुणे विभाग व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी वैशाली माळी, प्रदीप तळेकर, मंदार खरे, संजय खोत, सचिन इनामदार व धनंजय पाटील यांनी केले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00