Home क्रीडा Cycling Event India:बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’चे पिंपरी-चिंचवडकरांकडून जल्लोषात स्वागत

Cycling Event India:बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’चे पिंपरी-चिंचवडकरांकडून जल्लोषात स्वागत

लक्ष्मी चौक ते आकुर्डी–रावेत मार्गावर नागरिकांची दुतर्फा उसळलेली गर्दी

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २० जानेवारी २०२६ :ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाने भारलेले वातावरण अशा जल्लोषपूर्ण माहोलात पिंपरी-चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे भव्य स्वागत केले. वेग, शिस्त आणि क्रीडाभावनेचा सुंदर संगम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी (Cycling Event India)ठरली.

स्पर्धेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलपटूंचे शहरात आगमन होताच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक ते आकुर्डी–रावेत या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी हजारोंच्या संख्येने दुतर्फा गर्दी करून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निमित्ताने शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या वतीने स्पर्धेच्या स्वागतासाठी प्रमुख रस्ते व चौकांमध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली (Cycling Event India)होती.

पहिल्या टप्प्याला उत्साहात सुरुवात

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याचा समारोप आकुर्डी–रावेत येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथे झाला. या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्या हस्ते (Cycling Event India) करण्यात आला.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Cycling Event India)होते.

९१.८ किलोमीटरचा थरारक पहिला टप्पास्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे एकूण अंतर ९१.८ किलोमीटर इतके होते. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या मार्गावर काही ठिकाणी तीव्र वळणे तसेच चढ-उतार असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटूंनी वेग, कौशल्य आणि सहनशक्तीचा उत्कृष्ट मिलाफ सादर करत ही आव्हाने(Cycling Event India) लीलया पेलली.

स्पर्धा मार्गावर ठरावीक ठिकाणी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, तांत्रिक सहाय्य वाहने आणि रिफ्रेशमेंट पॉइंट्स सज्ज ठेवण्यात आले होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांच्या माध्यमातून संपूर्ण मार्गावर सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली (Cycling Event India)होती.

लक्ष्मी चौक ते आकुर्डी मार्गावर उत्स्फूर्त प्रतिसाद

महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक येथे सायकलपटूंचे आगमन होताच नागरिकांनी जोरदार स्वागत केले. लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे स्पर्धा आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथे पोहोचली. या संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी खेळाडूंना जल्लोषात प्रोत्साहन दिले. विशेषतः तरुणाई मोठ्या संख्येने (Cycling Event India) उपस्थित होती.

महापालिकेचे सूक्ष्म नियोजन

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’च्या पहिल्या टप्प्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व्यापक आणि सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन सुविधांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. काही कालावधीसाठी मार्गांवर वाहतूक वळवून आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बंद ठेवण्यात आले होते. तसेच उद्यान विभागाच्या वतीने चौकाचौकांत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली(Cycling Event India) होती.

भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा

या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांमध्ये क्रीडाविषयक जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सायकलिंगसह विविध खेळांतील दिग्गज खेळाडू, तसेच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविण्यात आले आहे. या भित्तिचित्रांमुळे शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले (Cycling Event India)आहे.

स्पर्धेतील विजेते

प्रथम – मॉडगवे लोके (Modgway Loke)

द्वितीय – सँटी आर्ने (Santy Arne)

तृतीय – जॉर्जिओस (Georgios)

बेस्ट इंडियन रायडर – हशवीर सिंग (Hashveer Singh)

बेस्ट यंग रायडर – स्पिएरो तामार (Spiero TaMar)

बेस्ट एशियन रायडर – साइनबायर (Saainbayarr)

किंग ऑफ माऊंटन – रायलेआनू क्रिस्टियन (Raileanu Cristian)

२३ जानेवारीला पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये ग्रँड टूरचा थरार

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’चा महत्त्वाचा टप्पा मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. या टप्प्याची सुरुवात दुपारी १.३० वाजता श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे–बालेवाडी येथून होणार आहे. बालेवाडी स्टेडियममधून सुरू झालेली ही स्पर्धा शहरातील विविध मार्गांवरून प्रवास करत दुपारी ४ वाजता जंगली महाराज रोड येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे समाप्त होणार आहे. या दिवशीही पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा थरार अनुभवता येणार (Cycling Event India)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00