Home माझं पिंपरी चिंचवड Mahesh Landge Reaction:भाजपाचा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित – आमदार महेश लांडगे यांची भावूक प्रतिक्रिया

Mahesh Landge Reaction:भाजपाचा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित – आमदार महेश लांडगे यांची भावूक प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला निर्विवाद बहुमत

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, पिंपरी-चिंचवडकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर ठाम विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालांमुळे भाजपाचा एकहाती महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला(Mahesh Landge Reaction) आहे.

“स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना आम्ही साद घातली होती. त्या सादेला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित आहे,” अशी भावूक प्रतिक्रिया भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी (Mahesh Landge Reaction) व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय वातावरण तापले होते. प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आजच्या निकालातून पिंपरी-चिंचवडची जाणती, जागरूक आणि स्वाभिमानी जनता भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले (Mahesh Landge Reactionआहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १२८ पैकी तब्बल ८५ जागांवर विजय मिळवला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ३६, शिवसेना (शिंदे गट) ६, तर अपक्ष १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजप व शिंदे गट युतीचे एकूण संख्याबळ ९१ वर पोहोचले असून, महानगरपालिकेत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले(Mahesh Landge Reaction  आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सक्षम व दूरदर्शी नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताच्या राजकारणाला दिलेली ठाम पोचपावती आहे. हा विजय केवळ भाजपाचा नसून, पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा(Mahesh Landge Reaction आहे.”

तसेच, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार उमा खापरे, विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते, मार्गदर्शक तसेच भाजपा परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. “या विचारांच्या आणि विकासाच्या लढ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे,” असेही आमदार लांडगे यांनी(Mahesh Landge Reaction सांगितले.

भाजपा कार्यकर्त्यांचे मानले आभार…

“पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आणि नेत्याने प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा सन्मान आहे. घराघरांत जाऊन केलेला संवाद, नागरिकांशी निर्माण केलेला विश्वास आणि संघटनात्मक ताकदीमुळेच हे यश शक्य झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णतः कटिबद्ध आहे. नागरिकांनी दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने जपला जाईल. महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांचा वेग वाढवून पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनवण्याचा संकल्प निश्चितपणे पूर्ण केला जाईल,” असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त(Mahesh Landge Reaction केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00